उत्तर प्रदेशात वादळी वारे, ताजमहालाच्या वास्तुचे नुकसान

1331

उत्तर प्रदेशात सध्या वादळी वाऱ्यांनी थैमान घातलं आहे. शुक्रवारी झालेल्या वादळामुळे आग्रा येथील ताजमहाल या ऐतिहासिक वास्तुचं नुकसान झालं आहे.

जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, या वादळी वाऱ्यामुळे मुख्य मकबऱ्यातील संगमरवरी रेलिंग तुटलं असून त्याच्या जाळ्याही पडल्या आहेत. ताजमहाल परिसरातील झाडेही कोलमडून पडली आहेत. तसंच ताजमहाल परिसरातील पर्यटकांच्या सोयीसाठी बनवलेल्या शेडचं फॉल्स सीलिंगही निखळून पडलं आहे.

याखेरीज महताब बागेच्या भिंतीवर आणि मरियमच्या मकबऱ्यावरही झाड पडलं आहे. याआधी 2018मध्ये झालेल्या वादळामुळे ताजमहालाच्या शाही आणि दक्षिण दरवाज्याचे दोन स्तंभ आणि काही दगड निखळून पडले होते.

आपली प्रतिक्रिया द्या