
ताज महालची सुरक्षा हायटेक करण्यात येणार आहे. सुरक्षेसाठी ड्रोन प्रतिरोधक यंत्रणा बसवण्यात येणार आहे. हवाई हल्ल्याचा धोका निर्माण झाल्यास ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल आणि हवाई हल्ले निष्क्रीय करण्यात येतील, अशी माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली. येथे आधीपासूनच सीआयएसएफ आणि उत्तर प्रदेश पोलीस तैनात आहेत. परंतु आता ड्रोन हल्ले रोखण्यासाठीही यंत्रणा उभारण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, भाजप खासदार रविशंकर यांच्या नेतृत्वाखालील खासदारांचे शिष्टमंडळ ऑपरेशन सिंदूरचा संदेश पोहोचवण्यासाठी बेल्जियम आणि युरोपातील फ्रान्स, इटली, डन्मार्क, इंग्लंड, बेल्जियम आणि जर्मनीच्या दौऱ्यासाठी रवाना झाले.