लातूर – तळणी मोहगाव येथे चोरट्यांनी घर फोडले, 2 लाख 76 हजाराचा ऐवज पळवला

रेणापूर तालुक्यातील तळणी मोहगाव येथे अज्ञात चोरट्यांनी घर फोडले. 2 लाख 76 हजार रुपयांचा ऐवज चोरुन चोरटे पसार झाले. या चोरी प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील चोरीप्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात सुधीर विलास माने रा.तळणी मोहगाव ता.रेणापूर यांनी दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, फिर्यादी हे आपल्या भावाचा घराच्या गच्चीवर झोपले होते. त्यांचे आई-वडील एका खोलीमध्ये झोपलेले होते. अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून आई-वडील झोपलेल्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद करून घेतला आणि बाजूच्या रुममधील लाकडी पलंगाखाली ठेवलेली पत्राची पेटी पळवली. गावात व गावाचे आजूबाजूला शेत शिवारात सदर पेटीचा व अज्ञात चोराचा शोध घेतला असता, तळणी ते मुरढव जाणारे रोडलगत जनार्धन किशनराव काळे यांचे ज्वारीचे शेतात बांधाजवळ पेटी मिळून आली. आम्ही तेथे जाऊन पाहणी केली असता, पेटीमधील साड्या व इतर सामान अस्तावेस्त पडलेले दिसले. व पेटी मधील सोन्याचे दीड तोळयाचे लाकेट किंमत अंदाजे 60000/-रुपये, सोन्याचे गंठण आडीच तोळयाचे किंमत अंदाजे 100000/- रुपये, सोन्याचे सरपाळे,फुल झुमके असे एकूण दीड तोळयाचे किंमत अंदाजे 60000/- रुपये, लहान मुलाच्या मनगटातील दोन्ही हातातील सोन्यांचे कडे 7 ग्रम किंमत अंदाजे 28000/- रुपये, सोन्याची अंगठी 5 ग्रॅम किंमत अंदाजे 20000/- रुपये, दोन सोन्याचे गळयातील एक एक ग्रॅमचे दोन पान किंमत अंदाजे 8000/- रुपये असे सहा तोळे नऊ ग्रॅम सोने एकूण किंमत 276000/- रुपयाचे चोरीला गेले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या