तळोजात बंद घरात सापडले एकाच कुटुंबातील चार मृतदेह, आत्महत्येचा संशय

1257
file photo

तळोजा येथील बंद घरात चार मृतदेह पोलिसांना आढळले आहेत. यामध्ये दोन बालकांचा समावेश आहे. हे घर राजेश भारद्वाज नावाच्या व्यक्तिचं आहे. भारद्वाज यांच्या घरात उपाध्याय नावाचं कुटुंब राहत होतं, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. दोन महिन्यांपूर्वी या कुटुंबाने आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पण, दोन महिन्यांपूर्वी आत्महत्या करूनही सोसायटीत कुणालाही त्याचा पत्ता लागला नाही, या बाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

तळोजा येथील शिव कॉर्नर, सेक्टर 9मध्ये भारद्वाज यांचं हे घर आहे. गेल्या आठ महिन्यांपासून नितीश कुमार उपाध्याय नावाची व्यक्ती तिच्या कुटुंबासह राजेश भारद्वाज यांच्या या घरात राहत होती. दोन महिन्यांपासून या घराचं भाडं भारद्वाज यांना देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे थकलेल्या भाड्याचे पैसे घेण्यासाठी भारद्वाज शनिवारी सकाळी त्यांच्या या घरी गेले. तेव्हा ही घटना उघडकीस आली.

आपली प्रतिक्रिया द्या