2021 च्या निवडणुकीत तमीळनाडूचे लोक आपला ‘करिश्मा’ दाखवतील – रजनीकांत 

829
रजनीकांत यांच्या 62 व्या वाढदिवशी चेन्नईतील न्यू नीला भवन या हॉटेलने त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांच्या नावावर 12 वेगवेगळ्या डिश त्यांच्या मेन्यूमध्ये सामिल केल्या

दक्षिण हिंदुस्थानातील प्रसिद्ध अभिनेते सुपरस्टार रजनिकांत यांनी 2017 मध्ये राजकारणात दमदार एन्ट्री केली. रजनी मक्कल मंद्रम या पक्षाची स्थापना केल्यानंतर आता ते राजकारणात सक्रीय झाले आहेत. रजनीकांत यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे की, ‘2021 च्या विधानसभा निवडणुकीत तमीळनाडूतील लोक आपला करिश्मा दाखवतील आणि सर्वांना चकित करतील.’

रजनीकांत यांनी अलीकडेच मक्कल निधि मायम पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांच्याशी हातमिळवणी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावर पत्रकारांनी त्यांच्याशी प्रश्न केले असता ते म्हणाले की, ‘युतीशी संबंधित निर्णय आणि मुख्यमंत्री कोण होणार याबाबतचे निर्णय निवडणुकीदरम्यान घेण्यात येईल.’

दरम्यान, कमल हसन यांनी ही मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दोन्ही पक्ष एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, ‘रजनीकांत माझा जुना मित्र आहे. आमची मैत्री 44 वर्षे जुनी आहे. जर आवश्यकता असेल तर तमीळनाडूच्या विकासासाठी आम्ही दोघेही एकत्र येऊ’. कमल हसन यांच्या या विधानानंतर रजनीकात यांनी देखील ‘आम्ही एकत्र येण्याने जनतेचा फायदा होणार असेल तर कमल हसनसोबत आघाडी करण्यासही मागेपुढे पाहणार नाही’, असे विधान केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या