तमिळनाडूत कोरोनामुळे दोघांचा मृत्यू, आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू

650

देशात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. देशात आतापर्यंत तीन हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तमिळनाडूत कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार एका 60 आणि 71 वर्षीय व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. 60 वर्षीय व्यक्तीला बुधवारी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. रविवारी त्यांचा मृत्यू झाला. तर 71 वर्षीय व्यक्तीला बुधवारी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. शनिवारी कोरोनामुळेच एका 54 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तमिळनाडूत आतापर्यंत कोरोनाचे 485 रुग्ण आढळले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या