Tamil Nadu Election – ठरलं! तमिळनाडूत काँग्रेस 25 जागांवर लढणार

तमिळनाडूत काँग्रेस आणि द्रमुकमध्ये जागावाटपाचा प्रश्न सुटल आहे. काँग्रेस तमिळनाडूत 25 जागांवर लढणार आहे.

तमिळनाडूत काँग्रेस आणि द्रमुकची युती झाली आहे. काँग्रेसने द्रमुकडे आधी 30 जागांची मागणी केली होती. पण द्रमुकने फक्त 18 जागा देण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये नाराजी निर्माण झालीए होती. इतकेच नाही तर काँग्रेस नेत्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला होता.

अखेर दोन्ही पक्षांमध्ये निर्णय झाला असून काँग्रेसला 25 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत द्रमुक, काँग्रेससोबत एमडीएमके, व्हिसीके, डावे पक्ष आणि छोट्या पक्षांची आघाडी आहे.

द्रमुकने मुस्लिम लीग आणि एमएमके पक्षासोबत जागावाटप निश्चित केली आहे. काही छोट्या पक्षांसोबत अजूनही चर्चा सुरू आहे. तमिळनाडूत 234 जागा असून 6 एप्रिल रोजी मतदान होणर आहे. तर 2 मे रोजी निकाल घोषित केले जातील.

आपली प्रतिक्रिया द्या