
लॉकडाऊनमध्ये जेवण शिकून 58 मिनिटांत तब्बल 46 डिश बनवत अनोखा विक्रम तामीळनाडूच्या एका मुलीने केला आहे. या मुलीच्या विक्रमाची नोंद युनिको ई बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये करण्यात आली आहे. एस.एन.लक्ष्मी साई श्री असे या मुलीचे नाव आहे. लक्ष्मीची आई एन.एलीमगल यांनी तिला लॉकडाऊनच्या काळात तामीळनाडूतील पारंपारिक पदार्थ बनवायला शिकवले. अल्पावधीतच ती चविष्ट जेवण बनवायला शिकली. स्वयंपाकातील मुलीच्या आवडीची कल्पना तिच्या आईने वडिलांना दिली. त्यानंतर वडिलांनी तिला विश्वविक्रमासाठी प्रोत्साहन दिले. लक्ष्मीनेही या संधीचे सोने करून दाखवले. 46 डिश तिने अवघ्या 58 मिनिटांत तयार केल्या आहेत. यापूर्वी केरळमधील 10 वर्षीय सावनी नावाच्या मुलीने 30 पदार्थ बनवले होते.

























































