
तामीळनाडूचे पृषिमंत्री एमआरके पनीरसेल्वम यांनी भाषिक वादात तेल ओतले. उत्तर भारतीयांना फक्त हिंदी भाषा येते त्यामुळे ते आमच्याकडे टेबल साफ करणे, पाणीपुरी विकण्यासारखे काम करतात. या उलट तामिळ विद्यार्थी इंग्रजीत पारंगत असल्यामुळे ते परदेशात नोकऱया करून कोटय़वधी रुपये कमावत असल्याचे अजब तर्पट पनीरसेल्वम यांनी मांडले.
पनीरसेल्वम यांच्या या विधानामुळे नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. तामीळनाडूचे पृषिमंत्री पनीरसेल्वम यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना भाषिक वादावर टिप्पणी केली. आमच्याकडे द्विभाषा धोरण आहे. तामिळ आणि इंग्रजी सोबतच शिकवले जाते. त्यामुळे आमचे इंग्रजीत पारंगत असलेले विद्यार्थी परदेशात कोटय़वधी रुपये कमावत असल्याचेही ते म्हणाले.

























































