तानाजी चित्रपटाची घौडदौड सुरूच, दुसऱ्या दिवसापर्यंत कमवले इतके कोटी

तानाजी – द अनसंग वॉरियर या चित्रपटाची घौडदौड सुरूच असून दुसऱ्या दिवशी तानाजी चित्रपटाने तब्बल 35.67 कोटी कमावले आहेत. तिसऱ्या दिवशीही या चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल होते. त्यामुळे येत्या काही दिवसात हा चित्रपट 100 कोटींचा टप्पा पार करेल अशी शक्यता आहे. तानाजी चित्रपटाने पहिल्याच दिवशी 16 कोटींची कमाई केली होती.

हिंदुस्थानचं दैवत मानलं जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्यासोबत प्राणांची बाजी लावून स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावरील या चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. सगळीकडे सध्या या चित्रपटाची चर्चा असून या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाची देखील जाम तारिफ होत आहे.

तानाजीसोबतच रिलीज झालेल्या छपाकच्या कमाईत देखील दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. पहिल्या दिवशी अवघे 4.77 कोटी कमावणाऱ्या छपाकने दुसऱ्या दिवशी 6.90 कोटी कमावले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या