तानाजीची घौडदौड सुरुच; गाठला 197 कोटींचा टप्पा

893

तानाजी सिनेमाची बॉक्सऑफिसवर कमालीची घौडदौड सुरु आहे. सध्या ‘तानाजी’ सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. दुसऱ्या आठवड्यातही हा सिनेमा हाऊसफुल होत आहे. अजय देवगणची प्रमुख भुमिका असलेल्या या सिनेमाने आतापर्यंत 197 कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमा बॉलिवूडमध्ये दुसऱ्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा आठवा सिनेमा ठरला आहे. ‘बॉक्स ऑफिस इंडिया.कॉम’च्या वृत्तानुसार, अजय देवगणच्या कारकिर्दीतील ‘गोलमाल अगेन’ या सिनेमाने दुसऱ्या आठवड्यात 46 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर आता ‘तानाजी’ने दुसरा आठवड्यात ‘गोलमाल अगेन’च्या पेक्षाही चांगली कमाई केली आहे.

बॉक्सऑफिसवर धमाल कमाई करणाऱ्या तानाजी सिनेमाला आता या शुक्रवारपासून ‘पंगा’ आणि ‘स्ट्रीट डान्सर’ या सिनेमाशी सामना असणार आहे. बॉक्स ऑफिस इंडिया. कॉमच्या वृत्तानुसार, हा सिनेमा लवकरच 200 कोटींचा टप्पा पार करणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या