नागपूर- अमरावती राष्ट्रीय महामार्गावर रसायनयुक्त टँकरला आग

466

नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील कोंढाळी दुधाळा जाम नदीच्या पुलाच्या बाजुला नागपुरहून अमरावतीकडे जाणाऱ्या रसायनाने भरलेल्या  टँन्करला रविवारी  दुपारी 2:15 वाजता आग लागली.  टँकरचेचे मागचे व समोरील टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टँकर दुभाजकाला धडकून उलटला. त्यानंतर टँकरने पेट घेतला. या आगीत टँकरच्या चालकाचा मृत्यू झाला आहे.

घटनेची माहीती कोंढाळी पोलीसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती काटोल उपविभागिय अधिकारी ( महसुल ) श्रीकांत उंबरकर व पोलीस उपविभागीय अधिकारी नागेश जाधव यांना मिळताच त्यांनी काटोल , नागपूर व सोलार एक्सप्लोझीव यांना अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठविण्याच्या सूचना दिल्या. सूचना मिळताच काही वेळातच नागपूर ,काटोल व सोलार येथून अग्निशमनाच्या कर्मचाऱ्यांनी पेट घेतलेल्या टँकरची आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, टँकरमध्ये रसायन असल्याने आगीने रौद्ररुप धारण केले होते. त्यामुळे आगा विझवण्यासाठी अग्निशमन दलाला थर्थीचे प्रयत्न करावे लागले. गावकऱ्यांच्या मदतीने अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

आपली प्रतिक्रिया द्या