देवदर्शनाला जाताना मोटरसायकलला अपघात, एक भाविक जागीच ठार

कोल्हापूर येथून आदमापूर येथे देवदर्शनासाठी आलेल्या भाविकाच्या मोटारसायकलला टँकरने धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवरील पांडुरंग गणपती ढेकळे हे जागीच ठार झाले. या घटनेची भुदरगड पोलिसांत नोंद झाली असून परराज्यातील टँकर चालकास ताब्यात घेण्यात आले आहे. आज सकाळी अकरा वाजता मुदाळतिटा ते मुरगुड रस्त्यावर एच. पी.पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला.

आज सकाळी मयत ढेकळे हे कोल्हापूर येथून देवदर्शनासाठी आदमापूर येथे मोटारसायकलवरून जात होते. त्या दरम्यान केमिकल घेऊन निपाणीकडे जाणाऱ्या मोटारसायकला या टँकरने धडक दिली. ढेकळे हे टँकरच्या पुढील चाकाखाली सापडले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना तातडीने उपचारासाठी 108 रुग्णवाहिकेतून गारगोटी ग्रामीण रुग्णालयात आणले. तथापि त्यांचे जागीच निधन झालेचे समजले. याबाबत मयत पांडुरंग गणपती ढेकळे यांचे पुतणे इंद्रजित एकनाथ ढेकळे यांनी भुदरगड पोलिसात फिर्याद दिली असून आरोपी टँकरचालक सुरेंद्रसिंग रामजी ठाकूर वय 28,रा. टाऊन सेमारझाल, ता.नरवाल, जि. कानपूर उत्तरप्रदेश याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या