
‘ताडदेवचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱया ‘ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’च्या वतीने अवयवदान रॅलीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात डॉ. निलेश सातबाई, रेल्वे अपघातात हात गमावलेल्या आणि पुन्हा अवयव दानातून हाताचे प्रत्यारोपण झालेल्या मोनिका मोरे, ज्येष्ठ पत्रकार संतोष आंधळे, सिनेट सदस्य किसन सावंत व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक, डॉ. जयदीप मिराशी, डॉ. संजय बोरुडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मंडळाचे मुख्य विश्वस्त सिद्धेश माणगावकर, विश्वस्त गणेश भोसले, सागर राणे, अध्यक्ष हरी तावडे, सचिव संजोग जाधव, खजिनदार विराज परब यांनी या रॅलीसाठी प्रयत्न केले.