‘तेहलका’ प्रकरण- तरुण तेजपालची कोर्टात इन कॅमेरा उलटतपासणी

516

आपल्या सहकारी महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले ‘तेहलका’ मॅगझीनचे प्रमुख तरुण तेजपाल यांची आज गोव्यातील न्यायालयात उलटतपासणी घेण्यात आली. ही तपासणी इन कॅमेरा घेण्यात आली. मुख्य म्हणजे इन कॅमेरा पहिल्यांदाच पीडित महिलाही खटल्यादरम्यान उपस्थित होती. सन 2013 साली मॅगझीनच्या एका कार्यक्रमावेळी तेजपालने सहकारी महिलेवर गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलच्या लिफ्टमध्ये अत्याचार केले.

याप्रकरणी पोलिसांनी तेजपालला अटक केली व मे 2014 साली त्याला जामीनही मंजूर करण्यात आला. म्हापसा येथील सत्र न्यायालयात न्यायाधीश क्षमा जोशी यांच्यासमोर आज याप्रकरणी तरुण तेजपाल तसेच पीडित महिलेची इन कॅमेरा उलटतपासणी घेण्यात आली. पुढील दोन दिवस ही इन कॅमेरा सुनावणी सुरूच राहणार आहे अशी माहिती तरुण तेजपाल यांची बाजू मांडणारे वकील ऍड. राजीव गोमस यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या