
टाटा पॉवरने वीजनिर्मितीबरोबरच वीज वितरणमध्येही आपला पंख पसरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार देशातील तब्बल एक कोटी ग्राहकांना वीजपुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. टाटा पॉवर सध्या मुंबई, दिल्ली आणि अजमेर येथील सुमारे 50 लाख वीज ग्राहकांना थेट वीज पुरवठा करत आहेत. त्याचबरोबर नुकतेच ओडिशामधील पाच सर्कलमध्ये वीज वितरण करण्याबाबतचा परवाना मिळवला आहे.
त्यामुळे लवकरच ग्राहकांची संख्या 50 लाखांनी वाढवण्यात येणार असल्याचे टाटा पॉवरचे सीईओ प्रवीर सिन्हा यांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी ग्राहकांना चांगल्या सेवा देण्यात येणार आहेत. दरम्यान, ओडिशामधील पाच सर्कलमध्ये वीज वितरणाचा परवाना मिळाल्याने त्यांना आता वाढीव सुमारे 1300 मेगावॅट वीज वितरित करावी लागणार आहे.

























































