ओडिशामधील वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी टाटा पॉवरची टीम रवाना

9

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

 ‘फनी’ वादळाच्या तडाख्यामुळे ओडिशा राज्यात मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. किनारपट्टी परिसरातील जवळपास एक लाखाहून अधिक विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. अनेक सबस्टेशन, लो ट्रन्समिशन लाइन बंद पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. तो दुरुस्त करून वीजपुरवठा पूर्ववत करण्यास स्थानिक यंत्रणेला सहाय्य करण्यासाठी टाटा पॉवरचे 25 अभियंते आणि तंत्रज्ञांची टीम ओडिशाला रवाना झाली आहे. सामाजकि बांधिलकीतून टाटा पॉवर नेहमीच आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात देते. ‘फनी’ वादळामुळे मोठय़ा प्रमाणात केलेल्या उपाययोजनांमुळे मोठी हानी टळली आहे. त्यामुळे आता झालेल्या नुकसानीतून नव्याने उभे राहण्यासाठी टाटा पॉवरने मदतीचा हात दिल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीर सिन्हा यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या