बहुचर्चित Tata Safari चा फर्स्ट लूक जारी, जाणून घ्या फिचर्स…

हिंदुस्थानची दिग्गज वाहन उत्पादन कंपनी टाटा मोटर्सने गुरुवारी Tata Safari चा फर्स्ट लूक जारी केला आहे. पुण्यातील कारखान्यात झालेल्या एका प्लॅगऑफ सेरेमनीनंतर ही नवीन सफारी शोरुमसाठी रवाना झाली. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ही नवीन सफारी शोरुममध्ये दिसले आणि लवकरच त्याची बुकिंगही सुरू होणार आहे.

safari1

टाटाची ही नवीन सफारीची इंटिरिअर थीम Oyster White रंगात असून कंपनी यासोबत Ash Wood डॅशबोर्डही देत आहे. तसेच कंपनीने व्हील आणि फ्रंटसाईडवर क्रोम फिनिश लूक दिला आहे.

safari2

नवीन टाटा सफारीत 2.0 लिटर, 4-सिलिंडर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. जे 168 बीएचपीची पॉवर आणि 350 एनएमची पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसह 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड टॉर्क कनव्हर्टर स्वयंचलित गिअरबॉक्स वापरला जाईल.

safari3

दरम्यान, टाटा मोटर्सने सफारीचे इलेक्ट्रीक व्हर्जनही येऊ शकते असे म्हटले आहे. याच पद्धतीने ही गाडी डिझाईन करण्यात आली आहे. तसेच देशाच एसयूव्ही कल्चरला प्रोत्साहन देण्यासाठी सफारीच्या नव्या अवताराला लक्झरी लूक देण्यात आला आहे. तसेच खास हिंदुस्थानी ग्राहकांना नजरेसमोर ठेऊन ही गाडी बनवण्यात आल्याचेही कंपनीचे सीईओ आणि एमडी गुएंटर बटशेक यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या