Video – तौकते वादळाचा रत्नागिरीत प्रवेश, वेगवान वाऱ्यांसह मुसळधार पावसाला सुरुवात

तौकते चक्रीवादळाचा तडाखा आता रत्नागिरी जिल्ह्याला बसू लागला असून राजापूरात वादळाने प्रवेश केला आहे.राजापूर पासून रत्नागिरीच्या किनारपट्टीवर वेगवान वारे वाहत आहेत.अनेक ठिकाणी झाडे पडली आहेत.काही परिसरात छप्परांवरील पत्रे उडून गेले आहेत.

तौक्ते चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवरून पुढे सरकत आहे.वादळाच्या धोक्यामुळे राजापूर तालुक्यातील आंबोळगड किनारपट्टीवर 68 कुटूंबातील 254 व्यक्तींचे स्थलांतरण करण्यात आले. आवाळाची वाडीतील 35 जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. राजापूर तालुक्यातील डोंगर गावातील रस्त्यावर झाड पडले. जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊसही सुरू झाला आहे.

तौक्ते वादळाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. मडगाव ते करमाळी दरम्यानच्या रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी झाडे कोसळली. ही झाडे तात्काळ तोडून टाकण्यात आली. रेल्वेमार्गावर झाडे पडल्याने नेत्रावती एक्सप्रेस काही काळ थांबविण्यात आली होती. पडलेली झाडे तोडून रेल्वेमार्ग सुरळीत करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या