टॅक्सी-रिक्षाचालकांना लसीकरणात प्राधान्य, तिसऱ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी घेतला आढावा

मुंबईत तिसऱया टप्प्यात उद्या, सोमवारपासून सुरू होणाऱया लसीकरणात फेरीवाले, हॉटेल्स कर्मचारी यांच्यासह टॅक्सीचालक आणि रिक्षाचालकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. हे सर्व सुपर प्रेडर्स असून हे लोकांच्या जास्त संपका&त येतात. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढू शकतो. हे लक्षात घेऊन पालिका त्यांच्या लसीकरणावर भर देणार आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिका अहोरात्र मेहनत घेत असून कोरोना चाचण्या आणि लसीकरणावर भर देत आहे. त्याचबरोबर जनजागृती तसेच मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतरासह कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन पालिका वेळोवेळी करत आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आणि सोमवारपासून सुरू होणाऱया लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कोरोनाला आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेची माहिती दिली.

भरारी पथकांची केंद्रांवर नजर

खासगी केंद्रांकडून सुरू असलेल्या लसीकरणावर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेने प्रत्येक प्रभागात दोन भरारी पथके नेमली असून ही पथके खासगी लसीकरणावर लक्ष ठेवणार आहेत. ही पथके थेट लसीकरणाच्या ठिकाणी जाऊन त्या पेंद्राची शहानिशा करणार आहे. तेथील डोस तपासले जाणार आहेत. कोणत्या रुग्णालयाकडून केंद्र सुरू आहे, रुग्णालय आणि सोसायटीमध्ये करार झाला आहे की नाही याची खात्री हे पथक करणार आहे.

…नंतरच लोकल सुरू करण्याचा निर्णय

मुंबईत अजूनही 600 ते 700 दरम्यान कोरोना रुग्ण सापडत आहेत. निर्बंध शिथिल झाल्यानंतरही रुग्णसंख्या आटोक्यात आहे. मात्र रुग्णसंख्या आणखी कमी होणे गरजेचे आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी लक्ष ठेवून आहेत. रुग्णसंख्या कमी झाल्यानंतरच लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे महापौर म्हणाल्या.

आपली प्रतिक्रिया द्या