
शाळेत जेवणाच्या डब्यात गोमांस आणल्याप्रकरणी एका शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे. तिला न्यायालयात सादर करण्यात आलं असून न्यायलयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
या शिक्षिकेचं नवा दालिमा नेसा असं आहे. दालिमा ही आसामच्या लखीपूर इथल्या हर्काचुंगी मिडल इंग्लिश स्कूल येथे मुख्याध्यापिका म्हणून काम करते. दालिमावर असा आरोप आहे की, 14 मे रोजी तिने शाळेत तिच्या डब्यात गोमांसाचा पदार्थ शिजवून आणला होता आणि तिने तो इतर शिक्षकांनाही देऊ केला होता.
त्या शिक्षकांपैकी काहींना ही बाब खटकली आणि त्यांनी याची तक्रार केली. त्याच दिवशी राज्य शिक्षण विभागाचा दौरा सुरू होता आणि त्यांनी शाळेला भेट दिली होती. त्यांच्यापर्यंत ही तक्रार गेल्यानंतर दालिमाला अटक करण्यात आली.
वास्तविक आसाममध्ये गोमांस खरेदी विक्री आणि सेवनावर बंदी नाही. पण, हिंदु, जैन, शीख आणि अन्य गोमांस निषिद्ध असलेल्या समुदायांच्या रहिवासी क्षेत्रापासून तसंच कोणत्याही मंदिरापासून पाच किमी अंतराच्या आत विक्रीला मनाई करण्यात आली आहे.

























































