
संगमेश्वर तालुक्यातील चाफवली–देवळे जिल्हा परिषद शाळेत अध्यापनाचे कार्य करत असताना अचानक आलेल्या तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने प्राथमिक शिक्षकाचे निधन झाले. गजानन मोघे शिक्षकाचे नाव आहेत. अखेरपर्यंत ज्ञानार्जनाचे काम करत असताना विद्यार्थ्यांसमोरच मन सुन्न करणारी घटना घडल्याने मुलांनाही अश्रू अनावर झाले.
मितभाषी स्वभाव, अध्यापनातील सर्वश्रेष्ठ गुणवत्ता, अभिनयकलेतील बादशहा आणि मुख्याध्यापक म्हणून दूरदृष्टी ही त्यांची खरी ओळख होती. नासा–इस्रोमध्ये सलग तीन वर्षे विद्यार्थ्यांची निवड होण्यामागे त्यांचे नेतृत्व आणि मार्गदर्शन मोलाचे होते. दांडगा सामाजिक संपर्क आणि माणुसकीचा स्पर्श त्यांच्या प्रत्येक कृतीत दिसत असे. आज त्यांच्या अकाली जाण्याने संगमेश्वर शिक्षण परिसरात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.


























































