तैवानमध्ये गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा; हैवान शिक्षकाचा 6 मुलीवर बलात्कार

गुरू-शिष्याच्या नात्याला पवित्र समजले जाते. मात्र, या नात्याला तैवानमध्ये एका हैवान शिक्षकाने सहा मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली. 30 वर्षीय बालवाडीचा शिक्षक माओ चुन शेनया नराधम शिक्षकाने घटनेचे व्हिडीओ तयार केल्याचे चौकशीत समोर आली. याप्रकरणी 28 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली असून, त्याला 11 गुन्ह्यांमध्ये, 207 शोषणाच्या आणि अश्लील फोटो आणि व्हिडिओ बनवल्याच्या सहा गुन्ह्यांसाठी दोषी ठरवण्यात आले.

तैपेई कोर्टाने सांगितले की, माओला एकूण 224 गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले होते, ज्यामध्ये कायद्यानुसार त्याची एकूण शिक्षा 1252 वर्षे आणि 6 महिने असेल. मात्र, त्याला 28 वर्षांची शिक्षा झाली. याविरुद्ध माओ अजूनही अपील करू शकतो.

तैपेई पिरॅमिड शाळेतील मुलींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून माओला जुलैमध्ये अटक करण्यात आली होती. त्याच्यावर 2022 मध्ये पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर पुराव्याअभावी तपास बंद करण्यात आला. नंतर अनेक प्रकरणे उघडकीस आल्यानंतर त्याला गेल्या वर्षी शाळांमध्ये शिकवण्यास बंदी घालण्यात आली होती. विशेष बाब म्हणजे माओ हा तैपेई पिरॅमिड शाळेच्या मालकाचा मुलगा आहे.

फोनमध्ये 600 अश्लील व्हिडिओ

माओवर अजूनही अनेक आरोप आहेत, ज्यांची चौकशी सुरू आहे. पीडित मुलांच्या कुटुंबीयांनी त्याचा फोन जप्त करण्याची मागणी केली होती. त्यानंतर माओच्या गुन्ह्याची संपूर्ण माहिती समोर आली. त्याच्या फोनवर 600 हून अधिक अश्लील व्हिडिओ आणि लहान मुलांचे फोटो होते. पुरावे समोर आल्यानंतर गेल्या महिन्यात जुलैमध्ये तैपेईचे महापौर चियांग वान-अन यांनी जाहीर माफी मागितली होती.