वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहितची मागणी मान्य

2226

बांगलादेशाविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेनंतर ‘टीम इंडिया’ मायदेशात एकदिवसीय व टी-20 मालिकेत वेस्ट इंडीजशी भिडणार आहे. या मालिकेसाठी हिंदुस्थानी संघाची गुरुवारी 21 नोव्हेंबरला घोषणा करण्यात आली. टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा याची मागणी मान्य करण्यात आली असून एक दिवसीय आणि टी-20 मालिकेसाठीच्या संघात त्याला स्थान देण्यात आले आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी संघाची निवड करण्याचीपूर्व निवड समिती ‘हिटमॅन’ रोहितला विश्रांती देण्याचा विचार करत होती. विंडीजशी खेळल्यानंतर हिंदुस्थानच्या संघाला न्यूझीलंडच्या मोठ्या दौऱ्यावर जायचे आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रमुख खेळाडू असलेल्या रोहित शर्माला विश्रांती देण्याचा निवड समितीचा मानस होता, मात्र जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या रोहितला विश्रांती नको होती. अखेर गुरुवारी जाहीर झालेल्या संघात रोहितची निवड करण्यात आली आहे.

दोन्ही संघात फक्त एक बदल
विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा संघ वेस्ट इंडीजशी भिडणार आहे. परंतु एक दिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या संघामध्ये फक्त एक बदल करण्यात आला आहे. एक दिवसीय मालिकेसाठी केदार जाधवला संघात स्थान मिळाले आहे, तर टी-20 मालिकेसाठी वाशिंग्टन सुंदरला संधी मिळाली आहे. तसेच भुवनेश्वर कुमारने संघात पुनपागमन केले आहे.

एक दिवसीय मालिकेसाठी संघ –
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के.एल. राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, केदार जाधव, रविंद्र जाडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार

टी-20 मालिकेसाठी संघ –
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के.एल. राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वाशिंग्टन सुंदर, रविंद्र जाडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार

टी-20 मालिका –

पहिला सामना – 6 डिसेंबर, मुंबई
दुसरा सामना – 8 डिसेंबर, तिरुवनंतपूरम
तिसरा सामना – 11 डिसेंबर, हैदराबाद

एक दिवसीय मालिका –

पहिला सामना – 15 डिसेंबर, चेन्नई
दुसरा सामना – 18 डिसेंबर, विशाखापट्टणम
तिसरा सामना – 22 डिसेंबर, कटक

आपली प्रतिक्रिया द्या