टीम इंडियाचा फलंदाज अभिनेत्रीसोबत अडकणार लग्नाच्या बेडीत

2223

टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज मनीष पांडे हा लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे समजते. अश्रीता शेट्टी असे त्याच्या होणाऱ्या पत्नीचे नाव असून ती मूळची मुंबईची आहे. अश्रीता ही दक्षिणेकडील चित्रपटातील अभिनेत्री आहे. अद्यात मनीषने याबाबत अधिकृतपणे जाहीर केलेले नाही मात्र त्याच्या व अश्रीताच्या लव्ह अफेयरबद्दल गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती.

ashrita-manish-pandey-1

मनीष व अश्रीताचे मुंबईत 2 डिसेंबरला लग्न होणार आहे. त्याच्या दोन दिवस आधीपासून लग्नाचे सर्व कार्यक्रम सुरू होणार आहेत. या सोहळ्यासाठी टीम इंडियाच्या खेळाडू उपस्थित राहणार आहेत.

मधल्या फळीतील फलंदाज म्हणून प्रसिद्ध असलेला मनीष हा त्याच्या आयपीएलमधील कामगिरीसाठी ओळखला जातो. आयपीएलमधील पहिले शतक ठोकण्याचा आगळा वेगळा विक्रम त्याच्या नावावर नोंद आहे.

आपली प्रतिक्रिया द्या