तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला लोळवलं, मालिका देखील जिंकली

विशाखापट्टनम येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत मालिका खिशात घातली. या मालिकेत टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर 2-1 अशा फरकाने मात करत केली. यशस्वी जैस्वालचे शतक, रोहीत शर्माच्या 75 आणि विराट कोहलीच्या 65 धावांच्या जोरावर टीम इंडियाने 271 धावांचे लक्ष्य पार केले.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारणाऱ्या टीम इंडियाला पहिल्याचा ओव्हरमध्ये पहिली विकेट मिळाली. मात्र त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी 20 ओव्हरपर्यंत थांबावे लागले. तोपर्यंत बवुमा व डी कॉक यांनी आफ्रिकेचा डाव सावरला होता. त्यानंतर मात्र आफ्रिकेच्या फलंदाजांनी सयंमी खेळ दाखवला व त्यांची धावसंख्या 270 पर्यंत पोहचवली. टीम इंडिय़ाकडून प्रसिध व कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 4 विकेट घेतल्या. तर अर्शदीप व जाडेजाने एक एक विकेट घेतल्या.

270 चे लक्ष्य पार करण्यासाठी उतरललेल्या टीम इंडियाच्या फलंदाजांनी जोरदार फलंदाजी केली. पहिल्याच ओव्हरमध्ये आफ्रिकेचा गोलंदाज मार्को जानसेनने सात वाईड बॉल टाकले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेवर चांगलाच दबाव वाढला. त्यानंतर रोहित शर्मा व यशस्वीने पहिल्या विकेटसाठी 25 षटकात 155 धावांची भागिदारी केली होती. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या विराटने देखील यशस्वीला चांगली साथ दिली.