
हिंदुस्थानची सर्वोत्तम जोडी म्हणून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. दोन्ही दिग्गज फलंदाजांनी कसोटी, टी20 आणि वनडेमध्ये दमदार फटकेबाजी करत धुरळा उडवून दिला. मात्र, 2024 चा टी20 वर्ल्ड कप उंचावल्यानंतर दोघांनीही आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर मे महिन्यात कसोटीमधून दोघांनी अचानक निवृत्ती घेत सर्वांनाच धक्का दिला. त्यांच्या निवृत्तीमुळे अनेक उलट सुलट चर्चा झाल्या. मात्र, आता टीम इंडियाचा माजी खेळाडू रॉबीन उथप्पाने रोहित-विराटला निवृत्ती घेण्यास भाग पाडल्याचा खळबळजनक दावा केला आहे.
मुंबई, दिल्ली, कर्नाटकची अपराजित हॅटट्रिक; गोवा, बिहारसह यूपी, एमपीचेही नॉनस्टॉप विजय
रॉबीन उथप्पाने आपल्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ पोस्ट करत रोहित आणि विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीवर भाष्य केलं आहे. तो म्हणाला की, “मला माहिती नाही की रोहित-विराटने हा निर्णय जबरदस्तीने घेतला होता का नाही, पण ते मनापासून निघून गेल्यासारखे अजिबात वाटत नाही. ते दोघेही योग्यवेळी सत्य काय आहे ते सांगतील. पण मला वाटत नाही की हा मनापासून घेतलेला निर्णय होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये जेव्हा रोहित चांगली फलंदाजी करत नव्हता, तेव्हा मला वाटले की त्याने सहा महिन्यांचा ब्रेक घ्यावा आणि फिटनेसवर काम करावे. मला विश्वास होता की, रोहित लवकरच कसोटी क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन करेल. पण तसे झाले नाही.” अशी खंत रॉबीन उथप्पाने यावेळी बोलताना व्यक्त केली.




























































