विश्वचषकातील पराभवावर शास्त्री पहिल्यांदाच बोलले, म्हणाले तो क्षण…

872

इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत विजेतेपदाचा दावेदार समजला जाणाऱ्या टीम इंडियाला उपांत्यफेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर टीका झाली होती. या पराभवानंतर आता पहिल्यांदाच शास्त्री यांनी विधान केले आहे. उपांत्यफेरीत पराभव झाला होता क्षण प्रशिक्षक कारकीर्दीच्या दोन वर्षातील सर्वात निराशाजनक होता, असे शास्त्री म्हणाले आहेत.

मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर पुन्हा निवड झाल्यानंतर ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला शास्त्री यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये विश्वचषकातील पराभवाचे शल्य त्यांनी बोलून दाखवले. गेल्या दोन वर्षातील तो सर्वात निराशाजनक क्षण होता. त्या 30 मिनिटांमध्ये सर्वकाही बदलले. आम्ही मजबूत होतो, परंतु सर्वकाही हातातून निसटून गेले, असे शास्त्री उपांत्यफेरीतील न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाबाबत म्हणाले.

विश्वचषकामध्ये आम्ही चांगले क्रिकेट खेळले. दुसऱ्या संघांच्या तुलनेमध्ये टीम इंडियाने सर्वाधिक सामने जिंकले. गुणतालिकेमध्ये आम्ही सर्वात वर होतो. परंतु एक खराब दिवस, एक खराब सत्र आणि सर्व काही बदलले, असेही शास्त्री पुढे म्हणाले.

विश्वचषकाच्या उपांत्यफेरीमध्ये टीम इंडियाला न्यूझीलंडकडून धक्कादायक पराभव सहन करावा लागला होता. टीम इंडियाचे टॉप-3 फलंदाज स्वस्तात बाद झाले होते. रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली प्रत्येकी एका धावावर बाद झाले. एक दिवसीय क्रिकेटमध्ये टॉपचे 3 फलंदाज एका धावेवर बाद होण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. पाच धावांवर 3 बळी गमावल्यानंतर टीम इंडियाचा पराभव पक्का झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या