रिषभ पंत की संजू सॅमसन? बांगलादेश दौर्‍यासाठी हिंदुस्थानी संघाची निवड आज

वेस्ट इंडीज व दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांना धूळ चारल्यानंतर आता हिंदुस्थानचा क्रिकेट संघ पुढील मिशनसाठी सज्ज झाला आहे. हिंदुस्थानला येत्या 3 नोव्हेंबरपासून बांगलादेशला भिडायचे आहे. या दौर्‍यात उभय संघांमध्ये दोन कसोटी व तीन ट्वेण्टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकांसाठी उद्या मुंबईत टीम इंडियाची निवड करण्यात येणार आहे. याप्रसंगी एम. एस. के. प्रसाद यांच्या अधिपत्याखालील निवड समिती रिषभ पंतवरच पुन्हा विश्वास दाखवतेय की युवा संजू सॅमसनला संधी देतेय हे पाहणे रंजक ठरणार आहे.

यष्टिरक्षणासाठी चुरस

यष्टिरक्षणासाठी युवा खेळाडूंमध्ये कमालीची चुरस आहे. रिषभ पंतच्या बेजबाबदार फटकेबाजीमुळे इतरांनाही संधी मिळाली आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा संजू सॅमसन या शर्यतीत पहिल्या स्थानावर असून इशान किशनवरही निवड समितीच्या नजरा असणार आहेत.

रोहितकडे नेतृत्वाची धुरा

गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने खेळत असलेल्या विराट कोहलीला बांगलादेशविरुद्धच्या ट्वेण्टी-20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात येऊ शकते. त्याच्याऐवजी मुंबईकर रोहित शर्माच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा सोपवण्यात येईल अशी शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या