टीम इंडियाच्या ‘सुपर फॅन’ चारुलता यांचे 87 व्या वर्षी निधन

756

टीम इंडियाच्या ‘सुपर फॅन’ चारूलता पटेल यांचे निधन झाले आहे. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इंग्लंडमध्ये गेल्यावर्षी झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील हिंदुस्थान-बांगलादेश दरम्यानच्या सामन्यात व्हीलचेअरवरून आलेल्या चारुलता पटेल या आजीबाईंनी लक्षवेधी धमाल केली होती.

charulata-patel2

पिपाणी वाजवणाऱ्या चारूलता पटेल या आजीबाईंचे फोटो सोशल मीडियावर भलतेच व्हायरल झाले होते. सामना संपल्यावर या आजीबाईंची कर्णधार विराट कोहली आणि सामनावीर रोहित शर्मा यांनी स्पेशल भेट घेतली. यावेळी आजीबाईंनी या दोघांनाही आशीर्वादही दिले होते.

charulata-patel

चारुलता यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर त्यांच्या नातीने निधनाची बातमी दिली आहे. ‘माझ्या आजीचे 13 जानेवारीला सायंकाळी 5.30 वाजचा निधन झाले. ती आम्हाला सर्वात प्रिय होती’, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

charulata-patel3

दरम्यान, हिंदुस्थानी संघाच्या आणि क्रिेकेटच्या मोठ्या चाहत्या असणाऱ्या चारुलता यांच्या निधनावर बीसीसीआय आणि आयसीसीने शोक व्यक्त केला. बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून चारूलता आणि विराट कोहली यांचा क्रिकेट विश्वचषकादरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. ‘टीम इंडियाची सुपर फॅन चारुलता पटेल नेहमी आमच्या मनात असतील. क्रिकेटसाठी त्यांचे प्रेम आम्हाला नेहमी प्रोत्साहन देईल. त्यांच्या आत्मास शांती मिळो’, असे बीसीसीआयने म्हटले आहे.

बीसीसीआयसह आयसीसीने देखील चारुलता यांचा क्रिकेट विश्वचषकादरम्यान विराटसोबत काढण्यात आलेला फोटो ट्वीट केला. ‘टीम इंडियाला चिअर्स करण्यासाठी वयाच्या 87 व्या वर्षी मैदानात येणाऱ्या चारूलता यांना भावपूर्ण श्रद्धांजली’, असे ट्वीट आयसीसीने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या