आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप;  ‘टीम इंडिया’ अव्वल

719

ऑस्ट्रेलिया व इंग्लंडदरम्यानची प्रतिष्ठेची ऍशेस कसोटी क्रिकेट मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटल्याने उभय संघांनी 56-56 गुणांची कमाई केली. या आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ‘टीम इंडिया’ सर्वाधिक 120 गुणांसह अव्वल स्थानी असून ऍशेस राखण्यात यशस्वी ठरलेला ऑस्ट्रेलियन संघ चौथ्या स्थानावर आहे. इंग्लंडचा संघ पाचव्या स्थानावर आहे.

ऍशेस मालिकेतील प्रत्येक कसोटीतील विजयासाठी 24 गुण होते. यात ऑस्ट्रेलिया व इंग्लंडने 2-2 कसोटी सामने जिंकले. ड्रॉ झालेल्या कसोटीत उभय संघांना 8-8 गुण मिळाले. मालिकेतील पहिली आणि चौथी कसोटी ऑस्ट्रेलियाने जिंकली, तर तिसरी आणि अखेरची पाचवी कसोटी यजमान इंग्लंडने जिंकली. दुसरी कसोटी ड्रॉ झाली. त्यामुळे दोन्ही संघांना या ऍशेस मालिकेत प्रत्येकी 56 गुण मिळाले. दुसरीकडे वेस्ट इंडीज दौऱयावर दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकून ‘टीम इंडिया’ 120 गुणांसह टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये अव्वल स्थानी कायम आहे. न्यूझीलंड आणि श्रीलंका प्रत्येकी 60 गुणांसह अनुक्रमे तिसऱया व चौथ्या स्थानावर आहे.

प्रत्येक संघ खेळणार 6 कसोटी मालिका

आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 12 पैकी 9 देश सहभागी झाले आहेत. आयर्लंड व अफगाणिस्तान या संघांना स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली नाही, तर ‘आयसीसी’ने बंदी घातल्याने झिम्बाब्वेच्या संघाला स्पर्धेत सहभागी होता आले नाही.

प्रत्येक मालिकेसाठी 120 गुण

टेस्ट चॅम्पियनशिपसाठी होत असलेल्या प्रत्येक कसोटी मालिकेसाठी 120 गुणांची विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक मालिकेतील कसोटी सामन्यांची संख्या वेगवेगळी असली, तरी गुण 120 ठेवण्यात आले आहेत. पाच सामन्यांची कसोटी मालिका असल्यास प्रत्येक सामन्यासाठी 24 गुण, तर चार सामन्यांची मालिका असल्यास प्रत्येक कसोटीसाठी 30 गुण असतील. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत प्रत्येक कसोटीसाठी 40, तर दोन सामन्यांच्या मालिकेत प्रत्येक कसोटीसाठी 60 गुण मिळतील. दोन वर्षांपर्यंत चालणाऱया या टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये एका संघाला जास्तीत जास्त 720 गुणांची कमाई करता येईल.

फायनल ड्रॉ झाली तर

टेस्ट चॅम्पियनशिपमधील फायनल कसोटी ड्रॉ किंवा टाय झाली तर लीग राऊंडमध्ये गुणतालिकेत सरस असलेल्या संघाला विजेता घोषित करण्यात येईल. त्यामुळे लीग राऊंडमध्ये अव्वल स्थानी असलेला संघ किताबी लढत किमान ड्रॉ करण्याचा प्रयत्न करेल. मात्र प्रतिस्पर्धी संघाला केवळ आणि केवळ जिंकण्यासाठीच सर्वस्व पणाला लावावे लागले.

आपली प्रतिक्रिया द्या