विंडीजविरुद्ध सराव लढतीत पुजाराचे शतक, रोहितचे अर्धशतक; ‘हे’ खेळाडू स्वस्तात बाद

701

वेस्ट इंडीजविरुद्ध टी-20 आणि एक दिवसीय मालिका विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया कसोटी मालिकेसाठी सज्ज होत आहे. रविवारी सराव सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माने अर्धशतकीय, तर चेतेश्वर पुजाराने शतकी खेळी केली. परंतु मयांक अग्रवाल, कर्णधार अजिंक्य रहाणे, केएल राहुल आणि ऋषभ पंतने मात्र निराशा केली. टीम इंडियाने पहिल्या दिवशी खेळ थांबेपर्यंत 88.5 षटकात 5 विकेट्स गमावून 297 धावा केल्या. त्यावेळी हनुमा विहारी 37 आणि रविंद्र जाडेजा एक धावांवर नाबाद होता.

तीन दिवसीय सराव लढतीत टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. सलामवीर मयांक अग्रवाल 12 धावांवर बाद झाला. कर्णधार रहाणे एक, केएल राहुल 36 आणि पंतही 33 धावा काढून बाद झाला. यानंतर पुजारा आणि रोहित शर्मा यांच्यात 132 धावांची चांगली भागिदारी झाली. रोहित 68 धावांवर बाद झाला. या दरम्यान पुजाराने 187 चेंडूत 8 चौकार आणि एक षटकार ठोकून शतकी खेळी साकारली. यानंतर इतर फलंदाजांना सराव व्हावा यासाठी तो रिटायर्ड हर्ट झाला. वेस्ट इंडीजकडून जोनाथथ कार्टरने सर्वाधिक 3 बळी घेतले.

आपली प्रतिक्रिया द्या