मेन्स इन ऑरेंज, नव्या जर्सीत टीम इंडिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लंडन

हिंदुस्थानचा क्रिकेट संघ येत्या रविवारी होणार्‍या इंग्लंडविरुद्धच्या लढतीत कोणती जर्सी घालून मैदानात उतरणार, या प्रश्नाचे उत्तर शुक्रवारी मिळाले. बीसीसीआयने आपल्या ट्विटवर अकाऊंटवरून टीम इंडिया भगवी जर्सी घालून इंग्लंडशी दोन हात करील असे सांगितले. याचसह त्या जर्सीचा फोटोही या अकाऊंटवर टाकला आहे.

नवीन जर्सीमध्ये समोरचा भाग हा निळ्या रंगाचाच ठेवण्यात आला असून दोन्ही हात आणि पाठीमागचा संपूर्ण भाग भगव्या रंगात ठेवण्यात आला आहे. 2019 विश्वचषक स्पर्धेसाठी आयसीसीने होम व अवे ही संकल्पना राबवली होती. त्यानुसार एकाच रंगाची जर्सी घालून खेळणार्‍या संघाना होम व अवे सामन्यांकरिता वेगवेगळ्या जर्सी घालणे बंधनकारक होते. त्यामुळे ही नवीन जर्सी घालून टीम इंडिया इंग्लंडविरोधात कसा खेळ करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.