
काल रवी शास्त्राr यांनीही वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला बार्ंमगहॅम कसोटीत विश्रांती दिल्याच्या मुद्दय़ावरून संघव्यवस्थापनावर नाराजी दर्शवली होती. त्यांच्याप्रमाणे इंग्लंडचे माजी कसोटीपटू डेव्हिड लॉयडही या निर्णयावर उखडले असून या निर्णयामुळे हिंदुस्थानने स्वतःच्या पायावरच कुऱहाड मारल्याची टीका केलीय.
सात दिवसांच्या विश्रांतीनंतरही बुमराला वर्कलोडच्या नावाखाली संघाबाहेर बसवण्याचा प्रकार अनेकांना गंभीर वाटला आहे. याबाबत लॉयड यांनीही आपल्या लेखात स्पष्ट मते मांडलीत. आपण दुसऱ्या कसोटीत खेळणार नाही आणि लॉर्ड्सवर खेळणार हे बुमराने सांगितले आहे का? की हिंदुस्थानच्या वैद्यकीय पथकाने त्याला खेळण्यापासून रोखलेय? हे एक रहस्यच आहे. मी जुन्या काळातला खेळाडू आहे आणि आपण क्रिकेटपटू आहात तर क्रिकेट खेळावे, असे लिहिलेय.
इंग्लंडच्या एका दैनिकात लिहिलेल्या लेखात लॉयड म्हणतात, बुमरा हा क्रिकेट जगतातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. आपला संघ आपल्या मागे चालतोय आणि आपल्याला एका आठवडय़ाचा आरामही दिला गेला असेल तर आपण फिट होऊन जोशात कसोटी खेळण्यासाठी सज्ज व्हायला हवे होते, असे त्यांनी बुमराचेही कान टोचलेत. त्यांनी हिंदुस्थानच्या संघ निवडीबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण केलेत. जेवढे मी संघातील बदलांबाबत ऐकलेय. हिंदुस्थानला लॉर्ड्सवर जिंकायचेय. तेसुद्धा 0-1 या पिछाडीनंतर. हेडिंग्लच्या पराभवानंतर हिंदुस्थानने आपल्या संघाला अधिक मजबूत केलेय. फलंदाजीला अधिक प्राधान्य दिलेय आणि त्यांना बार्ंमगहॅम कसोटी अनिर्णित राखायचीय. आपण कसोटीत मानसिकतेने उतरत आहात तर तुम्ही स्वतःच्या पायावर कुऱहाड मारून घेतली आहात, असेही टीकात्मक लिहिलेय.