
सामना ऑनलाईन । मुंबई
अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान हिच्या केदारनाथ या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या केदारनाथच्या पार्श्वभूमीवर रंगणारी प्रेमकथा असं या चित्रपटाचं स्वरूप आहे.
टीझरमध्ये एकही संवाद नाही. 2016मध्ये केदारनाथमध्ये प्रलय आला होता. त्या दरम्यान ही कथा घडताना दाखवण्यात आली आहे. केदारनाथमधील प्रलयामध्ये जखमी झालेल्या साराला वाचवणं हे सुशांतचं अंतिम ध्येय असल्याचं टीझरवरून दिसतंय.
टीझरमध्ये अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान यांनी जान आणली आहे. हा चित्रपट 7 डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.
पाहा व्हिडीओ-
summary- teaser of kedarnath released



























































