Moto G 5G लॉन्च, हिंदुस्थानातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत…

Motorola ने हिंदुस्थानात आपला Moto G 5G लॉन्च केला आहे. हा फोन हिंदुस्थानातील सर्वात स्वस्त 5G फोन आहे. असं असलं तरी हिंदुस्थानात अद्याप 5G सेवा उपलब्ध नाही. मात्र येत्या एक ते दोन वर्षात 5G नेटवर्क देशात येऊ शकत. ग्राहकही भविष्याचा विचार करून 5G फोन खरेदी करण्यास आपली पसंती देत आहेत.

कंपनीने हिंदुस्थानी बाजारात याची किंमत 20,999 रुपये इतकी ठेवली आहे. तसेच कंपनी आपल्या या स्मार्टफोनवर ऑफर ही देत आहे. तुम्ही HDFC बँकेच्या कार्डने हा फोन खरेदी केल्यास तुम्हाला 1 हजाराची सूट मिळू शकते.

Moto G 5G ची विक्री 7 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. हा फोन ग्राहक Flipkart या ई-कॉमर्स साईटवरून खरेदी करू शकतात. कंपनीने हा फोन ग्रे आणि सिल्व्हर कलरसह लॉन्च केला आहे.

Moto G 5G स्पेसिफिकेशन आणि फीचर्स

Moto G 5G मध्ये 6.7 इंच मॅक्स व्हिजन डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 750G प्रोसेसर देण्यात आला आहे..

Moto G 5G मध्ये 6 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. मायक्रो एसडी कार्डद्वारे स्टोरेज क्षमता वाढवली जाऊ शकते. या फोनची बॅटरी 5,000 एमएएच असून यासह 20 डब्ल्यू चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

Moto G 5G मध्ये तीन रिअर कॅमेरे आहेत. प्राथमिक लेन्स 48 मेगापिक्सेल, दुसरे 8 मेगापिक्सेल, तिसरे 2 मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर आहेत. सेल्फीसाठी या फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या