
ज्येष्ठ पत्रकार व विधिमंडळ वार्ताहर संघाचे सदस्य व माजी अध्यक्ष राजन चव्हाण यांचे सुपुत्र तेजस राजन चव्हाण (32) यांचे सोमवारी सौम्य हृदयविकार झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात आईवडील, पत्नी, भाऊ, भावजय असा परिवार आहे. तेजसच्या निधनामुळे ओरोस परिसरात शोककळा पसरली.
कुडाळ एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या कार्यालयात तेजस चव्हाण सुपरवायझर पदावर कार्यरत होते. सोमवारी कार्यालयात काम करत असताना त्यांना चक्कर येऊन ते खाली कोसळले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना लागलीच अन्य कर्मचाऱयांनी कुडाळ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचे तत्पूर्वीच निधन झाले होते.