Photo – फ्लोरल प्रिंटेड साडी, डीपनेक ब्लाऊज, केसात गजरा…पाहा अभिनेत्रीचा किलर लूक

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. एकता कपूरच्या नागिन 6 मध्ये महत्वाच्या भूमिकेत आहे. या शोमध्ये ती प्रथाच्या भूमिका साकारत आहे. तेजस्वी सोशल मीडीयावर प्रचंड अॅक्टीव्ह असते. नुकतेच तिने इंस्टावर साडीतले सुंदर फोटो शेअर केले आहेत. जे पाहून चाहत्यांच्या नजरा हटेनाशा झाल्या आहेत. 

‘बिग बॉस 15’ ची विजेती तेजस्वी प्रकाश कायम चर्चेत असते. सोशल मीडीयावर तिचे मोठे फॅन फॉलॉईंग आहे.

नुकतेच तेजस्वीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर साडीतले सुंदर फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीचे साडीतले फोटो पाहून चाहते खुश झाले आहेत.

तेजस्वी प्रकाशने फ्लोरल प्रिंटेड साडी नेसली असून तिने काळ्या रंगाचा डिपनेक ब्लाऊज घातला आहे. तिचा पारंपारिक लूक पाहून चाहते प्रेमात पडले आहेत. तेजस्वीने लाईट मेकअपसोबत आपल्या लूकने सौंदर्य खुलले आहे.

तेजस्वीने आपल्या केसांमध्ये भांग पाड आंबोडा घातला आहे. त्यावर सुंदर मोगऱ्याचा गजरा माळला आहे. तसेच गळ्यात चोकरसोबत हातात सुंदर अंगठी घाती आहे.

तेजस्वी प्रकाशच्या या फोटोंना आतापर्यंत लाखो लाईक्स मिळाले आहेत. तिच्या इंस्टाग्रामवर 6.1 मिलीअन फॉलोअर्स आहेत. चाहत्यांना तिचा पारंपारिक लूक आवडला आहे.