
आरजेडीचे नेते आणि बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष बनवण्यात आले आहे. पाटणा येथे झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी तेजस्वी म्हणाले की, एक तर नरेंद्र मोदी यांच्या चरणी बसा किंवा त्यांच्याशी लढा. पण आपण झुकणार नाही.

























































