देश चालवण्यात राष्ट्रीय पक्ष अपयशी, तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची भाजपवर टीका

देश चालवण्यात राष्ट्रीय पक्ष अपयशी ठरले आहेत अशी टीका तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी केली आहे. तसेच प्रवासी मजुरांकडून तिकिटाच पैसे घेत त्यांचे रक्त शोषले आहे असेही राव म्हणाले. हैद्राबाद महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली असून त्याच्या प्रचारासाठी राव बोलत होते.

राव म्हणाले की, हैद्राबादमध्ये जेव्हा पूर आला तेव्हा केंद्र सरकारने दहा रुपयांची मदत नाही केली. पण आता महानगर पालिकेची निवडणूक आहे की लोकसभेची निवडणूक. वेगवेगळ्या राज्यातील नेते इथे आले आहेत. हा देश चालवण्यात राष्ट्रीय पक्ष सपशेल अपयशी ठरली आहेत. एवढी वर्षे झाली तरी अजूनही देशात गरीबी आहे, अरोग्याचे प्रश्न आहेत, शिक्षणाचा अभाव आणि आजही लोकांना घर नाही असे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आता बदल झाला पाहिजे असा निर्धार राव यांनी व्यक्त केला. देशाच्या विकासात राजकारण होता कामा नये. हैद्राबाद निवडणुकीच्या माध्यमातून एक वेगळा संदेश गेला पाहिजे. केंद्र सरकार एलआयसी का विकत आहेत? हिंदुस्थानी रेल्वे ही जगातील चौथ्या क्रमाकांची रेल्वे आहे, ती सुध्दा केंद्र सरकार विकायला काढत आहे आणि कोणीही प्रश्न विचारत नाही. असे राव म्हणाले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची खुर्ची स्थिर नाही आणि  इथे येऊन आम्हाला शिकवात. 2014 साली तेलंगाणा राज्याचा क्रमांक दरडोई उत्पन्नात 13  वा क्रमांक लागत होता तो आता 2020  मध्ये पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालचे मजूर लॉकडाऊनमध्ये अडकले होते. तेव्हा केंद्र सरकारने त्यांच्याकडून तिकीटीचे पैसे घेऊन त्यांचे रक्त शोषण्याचे काम केले. तेलंगाणा राज्य सरकराने त्यांच्यासाठी 200  गाड्यांची व्यवस्था केली. इतकेच नाही तर त्यांना पैसे आणि अन्नाची सोय केली असेही राव यांनी नमूद केले.

आपली प्रतिक्रिया द्या