तेलंगणात कोरोनाग्रस्ताचा मृतदेह रिक्षातून लोंबकळत नेला

613

तेलंगणातील निझामाबाद येथे एका कोरोनाग्रस्ताचा मृतदेह चक्क रिक्षातून स्मशानभूमीला नेण्यात आला. हा मृतदेह नेण्यासाठी अॅम्ब्युलन्स नसल्याने तो मृतदेह रिक्षात पाय ठेवायच्या ठिकाणी आडवा ठेवून लोंबकळत नेला. रुग्णालयाने मात्र त्यांच्या नातेवाईकांनीच अशा प्रकारे मृतदेह नेल्याचे सांगितले आहे.

सदर 50 वर्षीय व्यक्ती 27 जून रोजी रुग्णालयात दाखल झाली होती. शनिवारी या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्या रुग्णाचे नातेवाईक रुग्णालयातच कामाला आहेत. त्यांच्या ताब्यात रुग्णाचा मृतदेह देण्यात आला. मात्र त्यांनी अॅम्ब्युलन्सची वाट न पाहता त्यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीच्या रिक्षातून मृतदेह नेला. असे निझामाबाद सरकारी रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. नागेश्वर राव यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या