अमेरिकेत हिंदुस्थानी व्यक्तीची हत्या, बुरखाधारीने गोळीबार केल्याची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । फ्लोरिडा

अमेरिकेत हिंदुस्थानी नागरिकांच्या हत्या व त्यांच्यावरील हल्ल्यांचे सत्र सुरूच असून मंगळवारी फ्लोरिडा येथे एका हिंदुस्थानी नागरिकाची हत्या करण्यात आली आहे. कोथा गोवर्धन रेड्डी असे त्या व्यक्तीचे नाव असून ते मूळचे तेलंगणातील भोंगिर येथील रहिवासी आहेत.

कोथा हे एका डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होते. मंगळवारी रात्री 8.30 च्या सुमारास एक बुरखाधारी व्यक्ती स्टोअरमध्ये घुसला व त्याने कोथा यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात कोथा व दुकानातील आणखी एक कर्मचारी जखमी झाला. त्या दोघांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथे पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. कोथा हे त्यांची पत्नी शोभा व मुली श्रेया व तुलसी यांच्यासोबत फ्लोरिडा येथे राहायचे. सात वर्षापूर्वी ते तेलंगणातून अमेरिकेत कामानिमित्त गेले होते.