छोट्या पडद्यावर गजर मोरयाचा

‘स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव 2021’ या गणपती विशेष कार्यक्रमात संपूर्ण ‘स्टार प्रवाह’ परिवार एकत्र येणार आहे. ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे स्वागत करण्यापासून ते अगदी आरती, गणेशजन्माची कथा, बाप्पाची गाणी असे सगळे अगदी जल्लोषात पार पडणार आहे. रविवार, 12सप्टेंबरला सायंकाळी 7 वाजल्यापासून प्रेक्षकांना या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येईल.

‘कलर्स’ मराठीवरील ‘सोन्याची पावलं’ या मालिकेत गौरी-गणपतीचे आगमन होणार आहे. तर ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेत ढालेपाटलांच्या घरामध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन होणार आहे.

– कोकणातील गणेशोत्सव हा वेगळा अनुभव असतो. ‘झी मराठी’वरील ‘रात्रीस खेळ चाले-3’ या मालिकेत या आठवडय़ात गणपती विशेष भागात कोकणातील पारंपरिक गणेशोत्सवाचे दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे. या विशेष भागांमध्ये प्रेक्षक भजनदेखील प्रेक्षक पाहू शकतील.

आपली प्रतिक्रिया द्या