14 वर्षीय इमिनाथी बवुमाचा प्रेरणास्रोत

दक्षिण आफ्रिकन कसोटी संघाचा कर्णधार टेम्बा बवुमाने आपल्या 14 वर्षीय चाहत्याची प्रेरणादायी कहाणी आपल्यासाठी जीवनाचा आदर्श कशी ठरली, हे गुपित अखेर उघडकीस आणले. बवुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर मात करत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. मैदानावरील या यशाबरोबरच मैदानाबाहेरही तो कठीण परिस्थितीचा सामना करत असलेल्या युवा खेळाडूंना प्रेरणा मिळावी यासाठी काम करतोय.

या सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेणाऱ्या बवुमाने सांगितले की, माझ्या दिवंगत आजीला ल्यूकेमिया झाला होता. घरात त्याविषयी फारसे बोलले गेले नाही. या संस्थेशी जोडल्याने केवळ त्या प्रसंगावर बोलता आले नाही, तर त्या वेदनेतून बाहेर पडण्यासही मदत झाली.

बवुमाला प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींमध्ये अप्लास्टिक ऑनिमियाने त्रस्त 14 वर्षीय इमिनाथीचाही समावेश आहे. त्याची कहाणी समजल्यावर बवुमाने त्याला वाँडरर्स मैदानावर आपल्या लायन्स संघाच्या प्रशिक्षण सत्राला आमंत्रित केले. प्रत्येकाला आयुष्यात नायकांची गरज असते. आपल्यासारख्या लोकांना यशस्वी होताना पाहिल्यावर आपले स्वप्नही शक्य असल्याची जाणीव होते, असे बवुमा म्हणाला.

तो पुढे म्हणाला, इमिनाथी ज्या संघर्षातून जातो, तो माझ्या संघर्षापेक्षा खूप मोठा आहे. तरीही तो चेहऱ्यावर हास्य ठेवतो, हीच खरी प्रेरणा आहे. यावेळी बवुमाने झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यातील एक प्रसंगही आठवला. तेव्हा दुखापतीमुळे ते खेळू शकला नव्हता आणि वियान मुल्डर कार्यवाहक कर्णधार होता. मुल्डर 367 धावांवर नाबाद असताना संघाने डाव घोषित केला आणि ब्रायन लाराचा 400 धावांचा विक्रम मोडण्याची संधी त्यांनी नाकारली. ‘जागतिक विक्रमासमोर संघाला प्राधान्य देणे हे आमच्या संघाचे खरे मूल्य दर्शवते.