
उत्तराखंडमधील अनेक भागांत जोरदार बर्फवृष्टी झाल्यामुळे तापमान प्रचंड घसरले आहे. उत्तराखंडमधील बद्रीनाथ मंदिरातील पारा उणे 16 अंशांपर्यंत घसरला आहे, ज्यामुळे धबधबे आणि तलाव गोठले आहेत. हिमाचलच्या लाहौल-स्पिती जिह्यात- ताबो उणे 7.4 अंशांपर्यंत, कुकुमसेरी उणे 3.1 अंशांपर्यंत, केलांग उणे 3.3 अंशांपर्यंत आणि कल्पा उणे 0.4 अंशांपर्यंत घसरला आहे. राजस्थान, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड आणि पंजाबमधील अनेक जिह्यांमध्ये तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाले आहे.

























































