देव सर्वत्र, घरातच पूजा करा; पर्युषण काळात जैन मंदिर सुरू करण्यास हायकोर्टाचा नकार

906

कोविडच्या संकटकाळात पर्युषण निमित्त जैन मंदिरात पूजा करण्यासाठी परवानगी देण्याचा अट्टहास करणार्‍या याचिकाकर्त्याला दिलासा देण्यास हायकोर्टाने आज नकार दिला. तुमच्या मते सर्वात मोठे मंदिर कोणते असा सवाल हायकोर्टाने याचिकाकर्त्याना विचारला त्यावर याचिकाकर्त्याने मानवतेचे मंदिर असे उत्तर दिले. मग मानवतेविषयी थोडी आत्मीयता दाखवा व मंदिर सुरू करण्याची मागणी सध्या तरी करू नका, परिस्थिती आटोक्यात आल्यास न्यायमंदिराचेच दरवाजे सर्वप्रथम उघडले जातील अशा शब्दांत मुख्य न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्याना सुनावले. एवढेच नव्हे तर प्रार्थनास्थळे सुरू करण्याची मागणीही फेटाळून लावली.

15 ते 23 ऑगस्ट दरम्यान येणार्‍या पर्युषण सोहळ्यात जैन मंदिर खुली करण्याची व पूजा करण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंती करणारी याचिका हायकोर्टात जैन बांधवांनी केली होती. न्यायमूर्ती शाहरुख काथावाला यांच्या खंडपीठाने गुरुवारी ही मागणी फेटाळून लावली. असोसिएशन फॉर एडिंग जस्टीस च्या वतीने अ‍ॅड. दीपक सिरोया यांनी हायकोर्टात आज पुन्हा एकदा याचिका दाखल केली.

न्यायालय काय म्हणाले?

  • देव आपल्यातच आहे, त्याचा अधिवास सर्वत्र आहे त्यामुळे कोविडचे संकट पाहता मानवतेच्या दृष्टिकोनातून पर्युषण काळात घरातच पूजा करा
  • मंदिर सूरु करण्याची मागणी सध्या करू नका
  • सार्वजनिक हितासाठी राज्य सरकारने प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याचा घेतलेला निर्णय योग्यच
  • कोरोनातून बाहेर पडण्यासाठी घरातच प्रार्थना करा
आपली प्रतिक्रिया द्या