टेम्पोची ताडपत्री फाडून विदेशी मद्य पळवले

528

अंबाजोगाई ते लातूर जाणाऱ्या रस्त्यावरील निवाडा फाट्याजवळ अज्ञात चोरट्यांनी टेम्पोची ताडपत्री फाडून आतील 7 बॉक्स विदेशी मद्य पळवल्याची घटना घडली.

या प्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात वैजनाथ भागुराम कानवटे (रा. बोडका ता. अहमदपूर) यांनी तक्रार दाखल केली. अंबाजोगाई ते लातूर जाणाऱ्या रस्त्यावर निवाडा फाट्याजवळ अज्ञात चोरट्यांनी आयशर टेम्पोची वरून ताडपत्री फाडून आतील विदेशी मद्याचे 7 बॉक्स पळवले. सुमारे 37365 रुपयांची दारु चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी कांबळे हे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या