पश्चिम रेल्वेवर सहाव्या मार्गिकेसाठी दहा तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून अनेक गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. गोरेगाव ते कांदिवली स्थानकादरम्यान शनिवारी रात्री९ ते रविवारी सकाळी 9 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. कांदिवली ते गोरेगाव दरम्यान फास्ट मार्गावर रात्री अकरा ते पहाटे साडे तीन वाजेपर्यंत साडे चार तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मेगाब्लॉक दरम्यान बोरिवली ते अंधेरी दरम्यान जलद मार्गावरच्या सर्व लोकल धीम्या मार्गावर धावतील. तर मेगाब्लॉकमुळे अनेक लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.