मुंबई अद्भुत नगरी! टेनेटच्या निमित्ताने क्रिस्टोफर नोलन यांनी सांगितल्या शूटिंगच्या आठवणी

‘टेनेट’च्या निमित्ताने मुंबईतल्या विविध भागांत शूटिंग करताना आणि खासकरून इथल्या स्थानिक लोकांसोबत काम करताना मला खूपच मजा आली. इथल्या लोकांचे चित्रपटाबद्दलचे प्रेम आणि चित्रपटनिर्मितीची पद्धत पाहून मी अक्षरशः भारावलो.

मुंबईतील वास्तुरचना आणि जीवनमानामुळे हे शहर जगभरात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असल्याचे मत हॉलीवूडचे प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन यांनी व्यक्त केले.

क्रिस्टोफर नोलन यांचा बहुचर्चित ’टेनेट’ हा चित्रपट आजपासून हिंदुस्थानात सात विविध भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे. मुंबईतील पुलाबा कॉजवे, कुलाबा मार्केट, गेटवे ऑफ इंडिया, ताजमहल पॅलेस हॉटेल आदी भागांत या चित्रपटाचे शूटिंग पार पडले आहे.

येथील शूटिंगच्या अनुभवाविषयी ते म्हणाले, ’मुंबईत आल्यावर मी इथल्या बॉलीवूडच्या आणखी जवळ आलो. येथील चित्रपट आणि प्रगत चित्रपटसृष्टी मला खूप भावली. येथील लोकांची चित्रपट निर्मितीची पद्धत, एरियल शॉट्सदरम्यानचे टीमवर्क पाहून मी भारावलो. पावसाळ्याचे दिवस असल्याने कमी दिवसांत शूटिंग पूर्ण करण्याचे आमच्यापुढे आव्हान होते. मात्र मुंबईतील वातावरण खूप सुंदर होते.’

टेनेटमध्ये जॉन डेव्हिड वॉशिंग्टन मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय बॉलिवूड अभिनेत्री डिंपल कापडिया या चित्रपटाद्वारे हॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या