नदालने मोडला जिमी कॉनर्सचा विक्रम

स्पेनचा दिग्गज टेनिसपटू रफाएल नदालने एटीपी रँकिंगमध्ये सलग 800 आठवडे अव्वल दहा जणांच्या रँपिंगमध्ये राहत नवा विक्रम प्रस्थापित केला. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच टेनिसपटू ठरला आहे. याआधी जिमी कॉनर्सने सलग 789 आठवडे अव्वल दहामध्ये राहत विक्रम नोंदवला होता. रफाएल नदालने हा विक्रम मोडीत काढला. रफाएल नदालने 10 एप्रिल 2005 साली पहिल्यांदा अव्वल दहा जणांच्या यादीत प्रवेश केला होता. तिथपासून सलग पंधरा वर्षे तो अव्वल दहा जणांमध्ये आहे हे विशेष.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या